Header Ads

Header ADS

खासदार नवनीत राणा कोरोना पॉझीटिव

 खासदार नवनीत राणा कोरोना पॉझीटिव

  (अमरावती न्यूज)खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.


नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनीत राणा यांनी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, "हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या," अशा भावना व्यक्त केल्या होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.