Header Ads

Header ADS

फैजपूर उपविभाग कोरोना अपडेट, दि..5 ऑगस्ट सकाळी 9 वाजता

 
फैजपूर उपविभाग  कोरोना अपडेट, दि..5 ऑगस्ट 
सकाळी 9 वाजता

*कोरोना मुक्त रूग्ण* 
रावेर--584
यावल--397
 
*Active रुग्ण* 
रावेर--89
यावल --51

 *शिल्लक बेड उपलब्ध* 
ऑक्सिजन शिवाय--350
ऑक्सिजन सह--100

--जर आपल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती,मधुमेह रुग्ण,रक्तदाब रुग्ण,किडनी रुग्ण असेल आणि त्यांना ताप, खोकला,श्वास घ्यायला त्रास,तोंडाला चव नसेल तर तात्काळ त्यांची कोरोना टेस्ट करून त्यांचे प्राण वाचवा..

--कोरोना होऊ नये म्हणून मास्क चा वापर करा..सुरक्षित अंतर ठेवा... गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका...

--कोरोना ची लक्षणे दिसताच डॉक्टर कडे दाखवा..कोरोना आजारामध्ये जेवढे लवकर उपचार घ्याल तेवढे लवकर बरे व्हाल..

--खाजगी डॉक्टर आणि औषधविक्री करणारे मेडिकल मध्ये लक्षणे असणारे रुग्ण आल्यास तात्काळ संपूर्ण डिटेल आरोग्य यंत्रणेला  कळवावे..त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायला आणि मृत्यू कमी करायला मदत होईल..

---कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा antigen किट उपलब्ध करण्यात आलेले आहेत..लक्षणे असल्यास आपल्या भागातील आशा ताई याना कळवावे..


--कोरोना ची लक्षणे लपवून घरी बसू नका...वेळ गेल्यास परत पश्चाताप शिवाय काही राहत नाही.

--कोविड केअर सेन्टर मध्ये आपली काळजी घेतली जाईल..आपल्याला बरे करण्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा तत्पर आहे..

--दररोज सकाळी 9 वाजता रावेर आणि फैजपूर या ठिकाणी कोरोना टेस्ट तपासणी होईल..रिपोर्ट 2 तासात मिळतील..negative रिपोर्ट आल्यास घरी सोडले जाईल..पोसिटीव्ह आल्यास उपचार केले जातील..

--कोरोना रुग्ण आणि त्यांचे घरातील व्यक्तींना आपल्या आधाराची गरज आहे..त्यांचा तिरस्कार करू नका..

--जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांना जर इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले plasma दान करावेत अधिक माहितिसाठी 9423035088 या नंबर वर whatsapp करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.