प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ता मोकळा करून द्या : शिवसेनेची मुख्यधिकारी यांचे कडे मागणी
प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ता मोकळा करून द्या :
शिवसेनेची मुख्यधिकारी यांचे कडे मागणी
(प्रतिनिधी सावदा) शहरातील प्रतिबंधित(कंटेन्मेंट झोन) क्षेत्रातून जाणारा रस्ता मोटरसायकल व पायी जाणाऱ्यांसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी नगरपालिकेचे मुख्यधिकारी सौरभ जोशी यांचे कडे शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील यांनी निवेदनाद्वारे दि ६रोजी सकाळी ११ वाजता केली आहे .
शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर हा नगरपालिका प्रशासनतर्फे प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात येत असतो . यात काही प्रतिबंधित क्षेत्र हे मुख्य रस्त्यावर आहे. याक्षेत्रात काही सुधारणा करून कमी करून या क्षेत्रातून जाणारा रस्ता मोटर सायकल व पायी नागरिकांना जाता येईल असा मोकळा करून द्यावा जेणे करून यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर परिसरातील नागरिकांना त्या रस्त्याने जाण्याचा त्रास कमी होईल . शहरातील प्रतिबंधित क्षेत्र लहान रून पायी मोटरसायकल जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात यावा अशी मागणी शिवसेना युवा सेने च्या वतीने करण्यात आली आहे . दिलेल्या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील ,माजी नगरसेवक शाम पाटील , माजी नगरसेवक धनंजय चौधरी , शहर सचिव शरद भारंबे,अनिल लोखंडे , उपशहर प्रमुख भरत नेहते आदींच्या सह्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत