Header Ads

Header ADS

१२ गावचे नागरिक दोन वर्षांपासून पुलाच्या प्रतीक्षेत, ठेकेदार गेले कुठे...

 १२ गावचे नागरिक दोन वर्षांपासून पुलाच्या प्रतीक्षेत, ठेकेदार गेले कुठे...


(ठाणे,दिपेश पष्टे )दि.०६ऑगस्ट: वसई तालुक्यातील मेढा फाट्यापासून पुढील १३ गावांना जोडणारा पुल ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे २ वर्षापासून रखडला आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाऊस जास्त झाल्याने सर्व गावांचा मुळ बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.

             ५० वर्षापासून असलेला पुल मुख्य शहरापासून १३ गावांना जोडला होता. २ वर्षापूर्वी त्याचे नूतनीकरण चालू केले होते. परंतु ठेकेदार यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे पुलाचे काम अपूर्णच ठेवले आहे. नवीन पुलाचे काम न झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही जास्त पाऊस झाल्याने पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. अशातच गावातील तरुणांनी आता त्या पुलाचा उपयोग आपल्या गाड्या धुण्यासाठी करायला लावला आहे. गावातील तरुणांचे म्हणणे आहे की  'या पुलाचा आम्हाला येण्याजाण्यासाठी उपयोग होत नसेल तर कमीत कमी गाडी तरी धुवायला केला पाहिजे, अशी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

        ५० वर्षापासून असलेला जूना पुल दिवसेंदिवस खुप नाजुक होत चालला आहे. पुलाचा खालचा (पाया कॉलम )भाग अतिशय कमकुवत झाला आहे. कोणत्याही क्षणी पूल वाहुन जाईल अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लवकर काम पूर्ण करावे. पुढील काही दिवसांत जर का हे काम पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असेही काही गावकऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.