बाप रे धक्कादायक: जळगाव जिल्ह्यात ४८७ रुग्ण बाधित
बाप रे धक्कादायक: जळगाव जिल्ह्यात ४८७ रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): येथील माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार कोरोन ७ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात १९९ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्ण ९३४४ आहे . जिल्ह्यात सध्या ३६३८ रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात ४८७ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १३५७४ झाली असून आता पर्यंत ५९२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्या भरात आज ४८७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात ९९ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ३१ , भुसावळ २३, अमळनेर ३२, चोपडा ४५ ,पाचोरा ०८ ,भडगाव ४३,धरणगाव १७, यावल ०९, एरंडोल ७९, जामनेर २८, रावेर ०६, पारोळा ३४ ,चाळीसगांव २६, मुक्ताईनगर ००, बोदवड ०४,इतर जिल्ह्यातील ०३असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
लेवाजगत आवाहन :
कोरोना बद्दल आपण जी शिस्त पाळत आहोत त्यापेक्षा अधिक शिस्तता पाळणे हे गरजेचे वाटत आहे.दोन व्यक्तीं व मित्रांनमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर ठेवावे .मास्क चा वापर सतत करत राहणे शिंकतांना, खोकताना रुमाल तोंडाशी धरावाच ;
वेळो वेळी चांगल्या पद्धतीने साबणाने हात पाय स्वछ धुऊन घ्यावे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपली थोडीशी चूक आपल्याला व आपल्या परिवाराला धोक्यात टाकू शकते.
"मला काही होणार नाही अश्या अहंकारी भ्रमात जगू नका".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत