Header Ads

Header ADS

वाह् रे लाँकडाऊन-राजेंद्र चौधरी रोझोदा

 


वाह् रे लाँकडाऊन


लाँकडाऊनची तारीख जशी वाढत असते

तशी लोकांची जीवन जगण्याची

पध्दतही बदलत असते,

कोरोना रुग्णांच्या संख्येत रोजंच वाढ होत असते

अन् वेगवेगळ्या अफवांची चर्चा घरात रंगत असते

लाँकडाऊनची तारीख पे तारीख

मात्र वाढतंच असते ll १ ll


चोऱ्या,दरोडे,लुटमारींची भिती सर्वांनाच वाटते

कोणाच्या मयताला जाणेही आता

धोक्याचे वाटते,

लाँकडाऊनमुळे जनतेच्या आशा-आकांक्षांवर 

दरदिवशी पाणी फिरते

जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारला 

कठोर भूमिका घ्यावी लागते

लाँकडाऊनची तारीख पे तारीख

मात्र वाढतंच असते ll २ ll


चढ्या भावाने वस्तू विकणा-यांची

रोजंच दिवाळी साजरी होते

बळीराजाच्या मालाला मिळणाऱ्या 

कवडीमोल किंमतीने मात्र

चिंता वाढत असते,

गड्या आपला गाव बरा असेच

आता शहरात म्हणावे लागते

पण बायको पुढे काहीच चालत नाही

म्हणून घरातच गप्प बसावे लागते

लाँकडाऊनची तारीख पे तारीख

मात्र वाढतंच असते ll ३ ll


काँलेजकुमारांना कँटिंन अन्

आयटमची आठवण भारी येते

भेट होत नाही म्हणून मोबाईलवरच 

समाधान मानावे लागते,

रेड झोन - आँरेंज झोनची आकडेवारी 

रोजंच बदलत असते

अन् प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याची 

चिंता जाम असते

लाँकडाऊनची तारीख पे तारीख

मात्र वाढतंच असते ll ४ ll


इंग्लिशच्या दारुची तहान आता

देशीवर भागवावी लागते

पाच रुपयाची तंबाखू पुडी

चाळीस रुपयाला घ्यावीच लागते

कारण तंबाखू पोटात गेल्याशिवाय 

टाँयलेटलाही होत नसते,

लाँकडाऊननंतर देशाच्या लोकसंख्येत 

वाढ होण्याची शक्यता वाटते

लाँकडाऊनची तारीख पे तारीख

मात्र वाढतंच असते ll ५ ll



                      राजेंद्र चौधरी.

                      रोझोदा.ता.रावेर.

                   मो.९४२३४७२७६५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.