आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला १कोटी ५१लाखाच्या विविध विकास कामांचा निधी मंजूर
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला १कोटी ५१लाखाच्या विविध विकास कामांचा निधी मंजूर
प्रतिनिधी सावदा
मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा व ऐनपूर विभागातील गावांना १कोटी ५१ लाखाचा निधी मंजूर .
मुक्ताईनगर मतदार संघाचे विकासाचा ध्यास असलेले कर्तव्यतत्पर आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर मतदार संघ (रावेर विभाग )अनुसूची २५१५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सा.बा. विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत लेखाशीर्ष सन २०१९-२० या करिता १.५१.०० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचा आदेश राज्याचे अपर सचिव यांनी जळगांव जिल्हाधिकारी यांना दिले असून प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेशात म्हटलेले आहे .
कार्यसम्राट आ. चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून सावदा परिसरातील ग्रामीण प्रभागातील वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मंजूर झालेली मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर तालुक्यातील विकास कामे मजूर केलेली आहेत. मौजे-सुनोदा येथे बसस्टॅण्ड ते उदळी रस्ता डांबरीकरण करणे १० लक्ष रु. ,मोठे वाघोदा बु.येथे सामाजिक सभागृह (पत्री)बांधकाम ५ लक्ष रु. तसेच काँक्रीटच गटार १० लक्ष रु.व दुर्गामाता चौक परिसरात पेव्हरब्लॉक बसविणे १५ लक्ष रु. ,खिर्डी बु.येथे संतोष भंगाळे ते योगेश तेली यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटिकरण ८ लक्ष रु.,खिर्डी बु.अरुण चौधरी यांच्या घरापासून ते ऐंनपूर रस्ता काँक्रीटकरण करणे ६ लक्ष रु. ,वाघाडी येथे गावांतर्गत पेव्हरब्लॉक बसवीनणे १० लक्ष रु. ,मागलवाडी येथे गावांतर्गत पेव्हरब्लॉक बसविणे ५ लक्ष रु., तांदलवाडी येथे श्री दत्त मंदिर ते आदर्शनगर पर्यन्त रास्ता कॉन्क्रीटीकरण ८ लक्ष रु.व व्यकटेशवर राममंदिरास वाल कंपाऊंड करणे १२ लक्ष. , कांडवेल येथे रस्ता काँक्रीटकरण १० लक्ष रु.व नवीन स्मशान भूमी बांधकाम करणे ६ लक्ष रु., रणगाव येथे वार्ड क्र.3 रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे ६ लक्ष रु., तासखेडा येथे वार्ड क्र.2 मध्ये प्रसाराम कोळी ते मूलचंद बाविस्कर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण ९ लक्ष रु.,रायपुर येथे वार्ड क्र १ व वार्ड क्र.२ मध्ये रस्ता काँक्रीटिकरण करणे ९ लक्ष रु., उदळी बु.येथे वार्ड क्र.१ मध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे ६ लक्ष रु.,बलवाडी गावांतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे १० लक्ष रु. ,कोळदा येथील श्री हनुमान मंदिर जवळ पेव्हरब्लॉक बसविणे ६ लक्ष रु. एवढे कामे मंजूर असुन यासाठी
तब्बल १,५१.00 लक्ष रुपये चा निधी मंजूर करण्यात आला आहे व आमदारांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार स्थानिक विकास निधीतुन रेंभोटा ता.रावेर येथे स्मशान भूमी संरक्षक भिंत बांधकाम करणे अंदाजे ७,००४७८ लक्ष रु. तसेच कांडवेल ता.रावेर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करने अंदाजे किंमत १५,८३,२६१ रुपये असे काही विकास कामे प्रगतीपथावर आहेत यासह संपूर्ण मतदारसंघात विकास हाच ध्यास ठेऊन मतदार संघात पूर्ण विकास कामे सुरूच राहतील अशी ही माहिती आ.चंद्रकांत भाऊ पाटील यांचे स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी व शिवसेना कार्यकर्ते दिनेश गंभीर पाटील उर्फ छोटू भाऊ पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत