यावल तालुक्यातमध्ये 9 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,त्यात शिरसाड 4, सावखेडा सिम 1, दहीगाव 2, आमोदा 1, कोळवद 1
यावल तालुक्यातमध्ये 9 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,त्यात शिरसाड 4, सावखेडा सिम 1, दहीगाव 2, आमोदा 1, कोळवद 1
यावल प्रतिनिधि:- 7 ऑगस्ट रोजी सकाळी आणि रात्री प्राप्त झालेल्या अहवालात 9 कोरोना रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहेत . हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 471 झाली आहेत. जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय व फैजपूर कोविड केयर सेंटर येथून आलेल्या अहवाला नुसार यावल तालुक्यातील शिरसाड येथे 4 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. 4 रुग्णांमध्ये 17 वर्षीय मुलगी ,एक 15 वर्षीय मुलगी व एक 37 वर्षीय महिला, एक 40 वर्षीय इसमाचा समावेश आहे. त्याच प्रमाणे दहीगावामध्ये देखील 2 कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यात 35 वर्षीय इसम, 20 वर्षीय तरुण असे आहेत, तर कोळवद गावात एक 34 वर्षीय इसम पॉझिटिव्ह आढळून आला आहे.सावखेडा सिम या गावामध्ये 41 वर्षीय इसम हा रुग्ण बाधित आढळला आहेत,तर आमोदा गावात एक 62 वर्षीय पुरुष हा आढळून आला आहे.यावल तालुक्यात एकूणच आज दिवसभरात 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.रुग्ण संख्या वाढून 471 झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत