पिंपरी चिंचवड मध्ये ७९५ बाधित रुग्णांची नोंद
पिंपरी चिंचवड मध्ये ७९५ बाधित रुग्णांची नोंद
सावदा लेवाजगत वृत्त:-आज दि.५ ऑगस्ट २०२० रात्री ८.१० वाजता आलेल्या अहवालात पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतची असून आजची बाधित रुग्ण संख्या ७९५ , शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या ०३.तर आज पर्यंत एकूण २५,१०६ कोरोना बाधित रुग्ण आहे.
एकूण मयत ५२१ , तसेच शहरातील एकूण मयतांची संख्या ४२३ असून शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या ९८ आहे.तर आजची मयत संख्या १६ आहे.
आज मृत झालेले रुग्ण पुनावळे (पुरुष ६८ वर्षे), दापोडी (स्त्री ६० वर्षे), भोसरी (पुरुष ७५ वर्षे, स्त्री ४५ वर्षे), कासारवाडी (पुरुष ६३ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ९८ वर्षे, पुरुष ७७ वर्षे, पुरुष ५० वर्षे, पुरुष ४५ वर्षे), मोशी (स्त्री ५३ वर्षे), सांगवी (पुरुष ५३ वर्षे), निगडी (पुरुष ५७ वर्षे), पिंपरी (पुरुष ६० वर्षे), आकुर्डी (स्त्री ६३ वर्षे), किवळे (पुरुष ७२ वर्षे), चाकण (पुरुष ५० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
😷 *STAY HOME 🏚️ STAY SAFE* 😷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत